खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथील गोशाळे संदर्भात भगवान कोकरे महाराज यांचे सुरू असलेले आमरण उपोषण आज अकराव्या दिवशी अखेर स्थगित करण्यात आले.सरकारच्या प्रतिनिधिंनी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून गोशाळे संदर्भात आश्वासित केले. त्यानंतर भगवान कोकरे महाराज यांनी आपले उपोषण अखेर मागे घेतले आहे.
वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, गोशाळा महासंघाचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, प्रदेश संयोजक सेवाप्रकोष भाजपाचे शेखर मुंदडा, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या मध्यस्थीने पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून गोशाळेच्या मागण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले. दरम्यान पुढील 25 दिवसात सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातर्फे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वारकरी संप्रदायचे प्रकाश महाराज जवंजाळ यांनी दिला आहे.
जाहिरात