अपघाताची पाच वर्ष पूर्ण… तेजश्री चा हा “पुनर्जन्म” च
तेजश्री श्रीराम वैद्य ही वडीलांच्या पावलांवर पाऊल टाकून पत्रकारितेत चांगले यश मिळवू पाहत होती आणि तसे तिचे प्रयत्न देखील सुरू होते.खरे म्हणजे पत्रकार हा देखील एक उत्तम साहित्यिक असतो. कारण त्याच्या पत्रकारितेतून विविध विषयांवर केलेले लिखाण हे साहित्य एवढेच दर्जेदार असते. त्यामुळे तेजश्री वैद्य पत्रकारितेत नवोदित होती, तरी विविध विषयांवर लिखाण करून तिने अनेक समस्यांना वाचा फोडली होती. तिच्या लिखाणात दुरदृष्टी होती.तिचे लिखाण हे तिने मांडलेले मत असायचे म्हणजेच नवनिर्मित ते साहित्य असायचे.
पत्रकारितेचे पाठ गिरवता गिरवता श्री. शांताराम गुडेकर (अभ्यासु, ज्येष्ठ मुक्त पत्रकार-मुंबई) यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आपली आवड यामुळे आपण करू ते अगदीच उत्तम आणि योग्यच करू.त्यामुळे ती नेहमीच आनंदी असायची.तिच्या या प्रेमळ, गोड व सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग तयार झाला.
पत्रकारिता हा खरा समाजसेवेचा वसा आहे. त्यामुळे सदोदित मदत कार्यात सहभागी होणे आणि अन्याय होत असेल तर त्यावर परखड लिखाण करणं हे तेजश्रीने केले त्यामुळे मित्र, मैत्रिणीचा नेहमी घोळका तेजश्री भोवती असायचा.
असेच दिवस मज्जा, मस्ती आणि पत्रकारिता मध्ये भुर्रकन निघून जात होते आणि अचानक तिचा १९ एप्रिल २०१८ रोजी तीचा रेल्वे अपघात झाला. “देव तारी, त्याला कोण मारी” याप्रमाणे दैव बलवत्तर म्हणून फार मोठ्या अपघातातून तेजश्री सुखरूप वाचली. ही परमेश्वराची कृपा व आई वडीलांची पुण्याई म्हणावी लागेल.
त्यानंतर समाजातील दानशूर व्यक्तींनी तिच्या वैद्यकीय उपचारासाठी केलेली आर्थिक मदत व आजमितीस उपचारासाठी होत असलेली आर्थिक मदत यामुळे विविध शस्त्रक्रियांवर मात करून तेजश्री पुन्हा नव्याने उभी राहत आहे. त्याच जोमाने, त्याच महत्त्वकांक्षेने. तिचे आई-वडील भाऊ, बहीण- भावजी यांच्या मदतीने आणि डॉक्टर यांच्या सल्ल्याने तिला मोठ्या धैर्याने उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आता तिच्यामध्ये चांगली सुधारणा झाल्याचे दिसून देखील येत आहे.मी अधून मधून तिचे वडील श्रीराम विष्णू वैद्य (काका) यांच्याकडे चौकशी करत असतो.
आज १९ एप्रिल रोजी रेल्वे अपघाताला ५ वर्ष पुर्ण झाली आणि तो प्रसंग डोळ्यासमोर आला.तेजश्री चा हा “पुनर्जन्म” आहे. निश्चितच या जन्मामधून तिच्या हातून पुण्याचे कार्य घडुन येण्यासाठी देवाने हा पुनर्जन्म दिला आहे. परमेश्वराचे लाख, लाख आभार आणि परमेश्वराजवळ हिच प्रार्थना की, तेजश्रीला पुन्हा तेच वैभव लाभू दे आणि तुझ्या कृपेने चांगले पुण्याचे कार्य तिच्या हातून सदोदित घडो ही तुला करबद्ध प्रार्थना..!!!
✒️🥇
श्री. रघुनाथ भागवत (महाड-रायगड)