लाडक्या बहिणींचा मविआला त्रास:1500 रुपयांचे महत्त्व गृहिणीला विचारा, देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर…

Spread the love

अकोला- लाडक्या बहिणींचा त्रास आता मविआला होत आहे. हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर स्वतःचे थोबाड लावतात अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या तीनच पक्षासोबत नाही तर चौथ्या म्हणजे खोट बोलणाऱ्या सोबत झाला असेही ते म्हणाले आहेत. अकोल्ह्यात ते बोलत होते.

योजनेचा महाविकास आघाडीला त्रास…

यावेळी फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, या योजनेमुळे आपण पुढे जात आहोत. या योजनेचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे. ते रोज या योजनेवर बोलत आहेत. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले. योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले. मात्र हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर योजनेसाठी सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप त्यांनी केले. तेव्हा सरकारने त्यांना पुढील बजेटपर्यंत पैसे ठेवल्याचा दाखल दिला”, असे फडणवीस म्हणाले.

1500 रुपयांचे महत्त्व काय, गृहिणीला विचारा…

पुढे फडणवीस म्हणाले, आता विरोधकांकडून 1500 रुपयांनी काय होते? असा सवाल होतो. मात्र ते तरी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले तरी त्या 1500 रुपयांचे महत्त्व काय आहे हे गृहिणीला विचारा. महिन्याच्या शेवटी याच 1500 रुपयांचे महत्त्व असते. मात्र जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयांची टीप देतात, त्यांना या रक्कमेचे महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे बहिणींची थट्टा करणे सुरू आहे. मात्र हे सावत्र भाऊ असल्याचे बहिणींच्याही लक्षात आले आहे”, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

जे खोटे असते त्याचे वय छोटे असते…

पुढे ते म्हणाले, लोकसभेत खोटा प्रचार त्यांनी केला. एक खोटा नेरेटीव्ह मुस्लिम समाजात देखील पसरवण्यात आला होता. लोकसभेत आपल्या जागा कमी आल्या. मात्र आपले मताधिक्य कमी झालेले नाही. त्यांच्यापेक्षा फक्त 2 लाख मते आपल्याला कमी मिळाले. भाजपच्या 12 जागा केवळ 3 टक्के मतांनी पडल्या. धुळे हे त्याचे उदाहरण आहे. अतिशय कमी मतांनी धुळ्यात पराभव झाला. मात्र जे खोटे असते त्याचे वय छोटे असते”, असे फडणवीस म्हणाले.

खोटा नरेटीव्ह हा 3 वर्षापासून सुरू..

तसेच पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या तीनच पक्षासोबत नाही तर चौथ्या म्हणजे खोट बोलणाऱ्या सोबत झाला. खोटा नरेटीव्ह हा 3 वर्षापासून सुरू झाला. 400 पार झाले तर आरक्षण जाणार संविधान बद्दलवणार असा खोटा प्रचार केला”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page