
शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे आमदार शेखर निकम यांनी केले जंगी स्वागत
उजगाव (सुतारवाडी) विकासासाठी कठीबद्ध-आमदार शेखर निकम
संगमेश्वर- आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यापासून प्रत्येक गावात नियोजनबद्ध अशी विविध विकास कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. कला, क्रीडा, पर्यटन, शिक्षण, उद्योग व ग्रामिण भागातील विविध विकास कामे करत तसेच बरेचसे प्रलंबीत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून दिला आहे.
कार्यसम्राट आमदार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून उजगाव सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी सावर्डे येथे जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये किरण पांचाळ, अध्यक्ष सुरेश पांचाळ, कृष्णा पांचाळ, रामचंद्र पांचाळ, रमेश पांचाळ, सुनील पांचाळ, मुकुंद पांचाळ, प्रमोद पांचाळ, चंद्रकांत पांचाळ, यशवंत पांचाळ, अनंत पांचाळ, रवींद्र पांचाळ, विनोद पांचाळ, परेश पांचाळ, प्रभावती पांचाळ, पूर्वा पांचाळ, रोशनी पांचाळ, निशा पांचाळ, वनिता वाझ्ये, सुहासिनी पांचाळ, अशोक पांचाळ, शुभम पांचाळ, महेंद्र पांचाळ, नथुराम पांचाळ, प्रकाश पांचाळ, राजेश पांचाळ याचा समावेश आहे. या प्रवेशकर्त्याचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले व राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत केले.
आमदार निकम ग्रामस्थांना पक्षप्रवेशावेळी म्हणाले की, पक्षांर्गत कामे करताना संघटीत होवून कामे करा पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार करा. विकास कामांची, निधीची तुम्ही चिंता करु नका ती माझी जबाबदारी राहील असा शब्द आमदार निकम यांनी उजगाव सुतारवाडी ग्रामस्थांना दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव जयंत खताते, जिल्हा नियोजन सदस्य दादा साळवी, दिनेश शिंदे, अनंत कोकरे, अमित जाधव, योगेश सावंत, सुनील बडद, संतोष बडद, पप्पू गोवळकर इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.