महायुतीच्या जागा वाटपापूर्वी भाजप उमेदवारांची नावे निश्चित:भाजप 150 ते 160 जागा लढवणार, फडणवीस, बावनकुळें दिल्लीला रवाना…

Spread the love

मुंबई- महाराष्ट्रात निवडणूकीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. यात भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. या यादीवर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासह चर्चा होणार आहे. यासाठी फडणीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत.

फडणवीस, बावनकुळे दिल्लीला रवाना…

महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतर भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता आहे.

जागावाटप ठरले तरी महायुतीची यादी लांबणार..

महायुतीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. भाजप 160 जागा लढवणार आहे. उरलेल्या 128 पैकी शिंदे सेनेला 80 जागा तर राष्ट्रवादी दादा गटाला 48 जागा जवळपास निश्चित आहेत. यातून तिन्ही पक्षांना मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. स्वत: भाजपमध्येही छुपी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पक्षशिस्तीमुळे उघडपणे भाजपतील कुणी बंडखोरी करण्याचे धाडस दाखवणार नाही.

मात्र, आतून विरोध होऊ शकतो. हे लक्षात घेता कोणती जागा, काेणत्या पक्षाला सुटली हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाले तर बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात. म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने 150 ते 160 जागा लढवल्यास 90 ते 95 जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल आहे.

2019 मध्ये काय होती परिस्थिती…

पूर्वी भाजप आणि सेनेतच जागावाटप असल्याने जास्त जागा वाट्याला यायच्या. मात्र आता अजितदादा गट आणि मित्रपक्षही सोबत असल्याने जागा कमी झाल्या आहे. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 105 उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 56 निवडून आले. राष्ट्रवादीने 121 लढवून त्यांचे 54 आणि काँग्रेसने 147 जागा लढवून 44 उमेदवार निवडून आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page