जीवघेण्या उष्णतेस तयार व्हा; पृथ्वीचे तापमान १.५% वाढणार; पूर, दुष्काळ, चक्रीवादळे येणार…

Spread the love

नवी दिल्ली :  जगाला येत्या काही वर्षांमध्ये आणखी विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. ही उष्णता माणसाच्या जिवावर बेतणारी, आगीत वाढ करणारी आणि अधिक असह्य ठरणारी असून,  जीवघेण्या उष्णतेसाठी सज्ज व्हा, असा इशारा जागतिक हवामान संघटना आणि  ब्रिटनच्या हवामान विभागाने दिला आहे. २०२५ ते २०२९ या पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान १.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता ७०%ने वाढली आहे. त्यामुळे पुढे उष्ण वर्ष येण्याची ८०% शक्यता असल्याचे डब्ल्यूएमओने म्हटले आहे.
     

अर्थव्यवस्थेला फटका


आपण मागील काळात सर्वांत १० उष्ण वर्षे अनुभवली आहेत. भविष्यातही तापमानवाढ अटळ असून, त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर, दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होणार असल्याचे डब्ल्यूएमओने सांगितले.
      

सरासरीपेक्षा १.२ ते १.९ टक्के तापमान जास्त असेल 

२०२५ ते २०२९ या दरम्यान प्रत्येक वर्षी सरासरी तापमानापेक्षा पृथ्वीचे तापमान १८५० ते १९०० दरम्यान म्हणजेच औद्योगिकीकरणापूर्वीच्या तापमान पातळीच्या सरासरीपेक्षा १.२ ते १.९ टक्के जास्त असेल.
     

या पाच वर्षांत किमान एक वर्ष असे असेल, त्याचे तापमान १८५०-१९००च्या सरासरीपेक्षा १.५ अंशांपेक्षा जास्त असण्याची ८६ टक्के शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.

१.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने काय होईल?

उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतील आणि उष्माघाताने मृत्यू वाढतील.
पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळे यांची तीव्रता वाढेल.
जंगलातील आग लागण्याचे प्रमाण अधिक होईल.
किनारपट्टीवरील भाग जलमय होतील, लोकांचे विस्थापन होईल.
अन्नधान्याचे दर वाढू शकतात आणि उपासमार वाढू शकते.
गरिबांवर आणि विकसनशील देशांवर याचे अधिक परिणाम होतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page