भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड, बीसीसीआयचा मोठा निर्णय….

Spread the love

लंडन दि १५ जून- भारताच्या संघाबाबत आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर यांच्या जागी आता भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी बीसीसीआयने एका अनुभवी खेळाडूची निवड केली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला इंग्लंडमधील कसोटी सामन्यासाठी नवीन प्रशिक्षक मिळाला आहे.

गौतम गंभीर यांच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते भारतात दाखल झाले. त्यामुळे आता ते आईची काळजी घेत आहेत. त्यामुळे गंभीर आता इंग्लंडमध्ये कधी पोहोचतील, हे सांगता येणार नाही. पण दुसरीकडे भारताचा पहिला कसोटी सामना हा २० जूनपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा हेड कोच कोण होणार, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला होता. पण आता बीसीसीआयने हा प्रश्न बीसीसीआयने सोडवला आहे. बीसीसीआयने एका अनुभवी खेळाडूला आता भारताच्या हेड कोच या पदावर नियुक्त केले आहे.

गौतम गंभीर यांच्या जागी हेड कोचची निवड करण्यासाठी बीसीसीआयपुढे तीन पर्याय होते. पहिला पर्याय हा व्हीव्हीएस लक्ष्मण होता. कारण आतापर्यंत लक्ष्मणने बऱ्याचदा हंगामी प्रशिक्षकपद म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. बीसीसीआयपुढे दुसरा पर्याय होता तो सितांशू कोटक यांचा. सितांशी कोटक हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत आणि ते संघाबरोबर आहे, त्यामुळे बीसीसीआयपुढे त्यांच्या नावाचाही पर्याय होता. त्यानंतर बीसीसीआयपुढे तिसरा पर्याय होता तो मॉर्ने मॉर्केलचा. कारण मॉर्ने मॉर्केल हा भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. पण बीसीसीआयने या तिघांच्या नावाचा विचार केला आणि त्यामधून त्यांनी आता लक्ष्मणची निवड केली आहे. लक्ष्मण यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा सितांशू कोटक आणि मॉर्ने मॉर्केल यांच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. त्याचबरोबर लक्ष्मण हे भारताच्या युवा खेळाडूंना चांगलेच ओळखतात. त्यामुळे आता गंभीर यांच्या जागी बीसीसीआयने लक्ष्मण यांची निवड केली आहे. गंभीर इंग्लंडमध्ये जाईपर्यंत लक्ष्मण हे संघाची हेड कोच म्हणून धुरा सांभाळतील, हे हंगामी हेड कोच पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

इंग्लंडमधील काही कसोटी सामन्यांसाठी गौतम गंभीर उपलब्ध असणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी बीसीसीआयने चांगला पर्याय सोधला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनपासून सुरु होणार असून आता लक्ष्मण हे भारतीय संघाला या सामन्यासाठी मार्गदर्शन करतील. त्यामुळे आता काही दिवस लक्ष्मण यांच्याकडे भारताच्या हेड कोच पदाची धुरा राहणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page