गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार, योगेश कदमांनी राजीनामा द्यावा, अनिल परबांची मागणी अन् राजकीय आरोपांच्या फैरी जोरात…

Spread the love

या प्रकरणी योगेश कदमांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केली. तर योग्य वेळी पुरावे देऊ असं योगेश कदमांनी म्हटलं आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार, योगेश कदमांनी राजीनामा द्यावा, अनिल परबांची मागणी अन् राजकीय आरोपांच्या फैरी जोरात..

मुंबई : ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. अनिल परबांनी माजी मंत्री रामदास कदम यांची पत्नी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर नवी मुंबईतील एक बार असल्याचा आरोप केला. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्या होत्या, असंही त्यांनी आपल्या आरोपात म्हटलं. या आरोपांवर कदम पितापुत्रांनी काय उत्तर दिलं? हे नेमकं प्रकरण काय आहे? हे पाहुयात,

गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार, योगेश कदमांनी राजीनामा द्यावा, अनिल परबांची मागणी अन् राजकीय आरोपांच्या फैरी जोरात



मुंबईच्या कांदिवलीतला सावली बार… हा बार आहे राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे. पण याच बारमध्ये मे महिन्यात पोलिसांनी एक कारवाई केली. त्या कारवाईची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांनी विधान परिषदेत दिली. त्यानंतर रडारवर आले माजी मंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम.

काय म्हणाले अनिल परब?…

अनिल परब म्हणाले की, “कांदिवली येथे सावली बार आहे इथे पोलिसांनी रेड केली त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचारी पकडले. याठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या गृहराज्यमंत्री यांच्या मातोश्री आहेत.”

अनिल परबांनी असे थेट आरोप करत सरकारला धारेवर धरलं. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्सबार मधे नाचवता?

या सगळ्या कारवाईनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा बार 31 मे पासून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, कदमांच्या बारवर जी धाड टाकण्यात आली त्यावेळच्या एफआयआरमध्ये काय काय होतं, तेही पाहा.

कदमांच्या बारवर धाड, एफआयआरमध्ये काय काय?

1. कांदिवलीत ‘सावली बार’ वर 30 मे 2025 रोजी धाड.२

2. सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने.

3. 30 मे च्या रात्री 10.50 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बार वर धाड.

4. धाडीवेळी बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी.

5. काही बार बाला आणि ग्राहक अश्लील नृत्यात करत असल्याचे निदर्शनास.

6. छाप्यानंतर वेटर,कॅशियर आणि मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात

7. बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असा मॅनेजरचा जबाब

8. धाडीनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या सगळ्या प्रकरणासंदर्भात रामदास कदमांनी हा बार पत्नीच्याच नावे असल्याचं कबुल केलं. ते म्हणाले की, “सावली बार माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा. पण बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच. नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते. करारानुसार बारमध्ये काही झाल्यास चालवणाराच जबाबदार असतो. माझ्या पत्नीच्या नावे 30 वर्षांपासून परवाना आहे. व्यवसाय करणे हा गुन्हा आहे काय? अनिल परब अर्धवट ज्ञान असलेले वकील आहेत.

याप्रकरणी अनिल परबांनी गृहराज्यमंत्री असलेले रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर यामध्ये राजकारण केलं जात असून यासंबंधीचे पुरावे समोर आणू असं योगेश कदम म्हणाले.

या सगळ्या प्रकरणानंतर रामदास कदमांनी अब्रुनुकसानीच्या दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर योगेश कदमांनी वाशीमधल्या बारवर कारवाईचे आदेश दिल्यानं अनिल परबांनी सूडापोटी हे सगळे आरोप केल्याचा आरोप रामदास कदमांनी केला.

रामदास कदम म्हणाले की, आमची बदनामी करणारा हा दावा आहे. सगळी चुकीची माहिती विधीमंडळात दिली. धंदा, व्यवसाय करणं चुकीचं नाही, 30 वर्षांपासून आम्ही यात आहोत. योगेश कदमने वाशीच्या बारवर धाडी टाकल्या त्याचा बदला म्हणून हे केलं जातंय.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांपेक्षा संजय गायकवाडांचा राडा, संजय शिरसाटांचा व्हिडीओ, पडळकर-आव्हाड समर्थकांची फ्रीस्टाईल हाणामारी हे आणि असे अनेक मुद्दे गाजले. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांच्या समस्यांशी काडीमात्र संबंध नव्हता. त्यात अनिल परबांच्या आरोपांचीही भर पडली. त्यामुळे ही नेतेमंडळी वैयक्तिक उणीदुणी काढणं, आरोप-प्रत्यारोप करणं, पक्षांतर्गत संघर्ष मध्ये आणणं यासाठी किती वेळ खर्ची घालतात? आणि सभागृहात जनतेचे प्रश्न किती मांडतात? हा खरं तर संशोधनाचा विषय ठरावा.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page