संतोष देशमुख हत्याकांड : फरार संशयित वाल्मीक कराडसह चारही आरोपींचे बँक खाते गोठवले…

Spread the love

बीड l 30 डिसेंबर- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण सध्या तापलेलं आहे. बीडच्या रस्त्यावर जनतेच्या असंतोषाचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान हे प्रकरण सीआयडीकडं गेल्यानंतर फरार संशयित आरोपी वाल्मीक कराडसह चारही आरोपींचे बँक खाते सीज करण्यात आले आहेत. संपत्ती जप्तीची कारवाई सीआयडीनं सुरू केली आहे. खून आणि खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीची नऊ पथक सध्या करत असून जवळपास दीडशे अधिकारी आणि कर्मचारी ही जबाबदारी संभाळत आहेत. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात संतोष देशमुख खून झाला त्यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीतील बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशाशी मॅच झाले आहेत, अशी माहिती देण्यात  देण्यात आली आहे.                         

दरम्यान गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या गाडीत दोन मोबाईल सापडल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. या दोन मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्यात सीआयडीला यश आले आहे, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला.  संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी केलेल्या चित्रीकरणातून देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केली असल्याची बाब उघडकिस आली आहे. या खून प्रकरणाशी संबंधित आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून महत्वाची माहिती सीआयडीला मिळाल्याचे समजत आहे.

सीआयडीची पथकं फरार आरोपींचा तपास राज्यासह देशभरात सध्या करत आहे. आरोपींच्या संपत्ती जप्ती सोबतच त्यांनी देशाबाहेर पलायन करू नये, यासाठी पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई सुरू केली असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page