जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४ अंशाच्या पुढे गेला

मुंबई- 16 मे 2023: एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) वाढणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे तर दुसरीकडे तापमानात पुन्हा वाढ होत आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात ४० अंशांपेक्षा (Heat waves) जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४ अंशाच्या पुढे गेला असून, धुळे, परभणी वर्धा येथे तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे.