ठाणे : प्रतिनिधी Avinash Jadhav Banned : ठाणे मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना मुंब्रा (Mumbra) शहरात आणि आसपासच्या परिसरात येण्यापासून ठाणे पोलिसांनी (Thane Police) बंदी घातली आहे. कालच अशाप्रकारचे आदेश काढण्यात आले आहेत.
अविनाश जाधव यांना २७ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान मुंब्र्यात येण्यास बंदी
अविनाश जाधव यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राजकीय गुन्हे दाखल असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या आदेशानुसार जाधव यांना २७ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत मुंब्र्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक मालमत्ता आणि जीवितास कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
मुंब्रा धार्मिकदृष्ट्या संवेदनशील : पोलीस
संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, मुंब्रा हा (धार्मिकदृष्ट्या) संवेदनशील परिसर आणि रमजान महिन्याचा दाखला देत सहाय्यक पोलीस आयुक्त (कळवा डिव्हिजन) विलास शिंदे यांनी अविनाश जाधव यांच्याविरोधात सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत प्रवेशबंदी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा