कुणबी राजकीय समिती संचलित मुंबईत “बळीराज सेना” राजकीय पक्षाची नव्याने घोषणा

मुंबई (सचिन ठिक) तुम्ही प्रत्येक जण शेतकरी आहात ना? तर प्रत्येक शेतकऱ्याचा राजा सम्राट बळीराजा आहे. हा पक्ष फक्त कुणबी समाजाचाच नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे.प्रत्येक ओबीसी आणि प्रत्येक मागासवर्गीयांचा पक्ष आहे आणि प्रत्येक रंजल्या आणि गांजलेल्यांचा पक्ष आहे आणि म्हणून प्रत्येकाला वाटलं पाहीजे, हा आपला पक्ष आहे… “बळीराज सेना” असे प्रतिपादन नव्याने स्थापन झालेल्या बळीराज सेनेचे अध्यक्ष श्री अशोक वालम यांनी पक्षस्थापनेवेळी केले.
दिर्घ कालावधीनंतर कोकणात पुन्हा एकदा राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई व राजकीय संघटन समिती संचलित मुंबई “बळीराज सेना” या नव्या राजकीय पक्षाची स्थापना आज अक्षयतृथीयेच्या शुभमूहूर्तावर मुंबईतील रविंद्र नाट्यगृह येथे झाली असून या पक्षाच्या अध्यक्षपदी श्री अशोक वालम यांची हजारो लोकांच्या उपस्थितीत निवड झाली आहे.श्री अशोक वालम हे निर्भिड व्यक्तीमत्व असून कोकणात होऊ घातलेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प पळवून लावण्यात महत्वाचा वाटा आहे.अक्षय तृथीयेच्या शुभमुहूर्तावर 12 वाजून 3 मिनीटांनी बळीराज सेनेची घोषणा करण्यात आली.आणि राजकारणात लुप्त होत असलेल्या कुणबी समाजबांधवांना नव्याने उभारी मिळाली. ही घोषणा जल्लोषमय वातावरणात करण्यात आली.फटाक्यांची आतषबाजी,सुरेल संगीत आणि मंत्रमुग्ध करणारे पोवाडे यांच्या मेजवानीने संपुर्ण नाट्यगृह दणाणून गेले होते.या पक्षस्थापनेमुळे कोकणात विखुरलेला कुणबी समाज आता एका पक्षाच्या झेंड्याखाली येण्यास मोकळा झाला आहे.
यावेळी संघाध्यक्ष भुषण बरे,माजी आमदार दिगंबर भिसे (कार्यक्रमाचे अध्यक्ष),सरचिटणीस अरविंद डाफले,युवाध्यक्ष माधव कांबळे, उपाध्यक्ष पाष्टे,राजकीय संघटन समितीचे कार्याध्यक्ष श्री कृष्णा कोबनाक,सेक्रेटरी श्री संभाजी काजरेकर,सेक्रेटरी नंदकुमार मोहीते,श्री प्रकाश तरळ,श्री महेंद्र टिंगळे,प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष,कुणबी समाजाच्या सर्व शाख्याध्यक्ष,महिला संघटनांच्या प्रमुख सुवर्णाताई पाटील,विवाह मंडळाचे अध्यक्ष,सर्व समाज बांधव आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पक्षाध्यक्ष श्री अशोक वालम म्हणाले की,
कोकणात कुणबी समाज संख्येने मोठा,परंतु पक्षांच्या दावणीला बांधलाय
65 ते 70 टक्के एवढा मोठा कुणबी समाज कोकणात आहे. संपुर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 22 जिल्हांमध्ये कुणबी समाज आहे.ओबीसी 52 टक्के आहेत.आपण समाज आहे म्हणतोय परंतु तो तो कुठेतरी हरवलाय आहे. तो कुठल्या ना कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला गेलेला आहे.कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याने अमिषाला बांधून ठेवलेले आहे.आणि हा दावणीला बांधलेला समाज यांना जर सोडवून घ्यायचा असेल तर मात्र आपण स्वतंत्र राजकीय व्यासपीठ तयार केल्याशिवाय गत्यंतर नव्हते असे म्हणाले.
श्यामराव पेजे यांनी कोकणात 12 आमदार निवडुन आणले
या राजकीय पक्षांनी आपल्या गावकी,भावकीत जो वाद निर्माण केलाय तो जर घालवायचा असेल तर राजकीय पक्षाशिवाय पर्याय नाही.कारण ज्यांची प्रेरणा घेवून आपण जातोय ते श्यामराव पेजे यांनी आपल्या स्वताच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 12 कुणबी आमदार निवडुण आणले होते.परंतु गेल्या 30 वर्षात एकही नाही. ही चुकी दुसरी कोणाचीही नाही तर ही आपलीच आहे.कारण ही दशा विविध राजकीय पक्षांनी करुन ठेवली आहे.आपला समाज प्रामाणिक आहे.समाज बांधव प्रामाणिक आहे.परंतु समाजातील पुढाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.त्यांना विकले आहे.
हा पक्ष कुणबी समाजाचाच नाहीतर प्रत्येक ओबीसी घटकाचा,कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा
तुम्ही प्रत्येक शेतकरी आहात ना…तर प्रत्येक शेतकऱ्याचा राजा सम्राट बळीराजा आहे. हा पक्ष फक्त कुणबी समाजाचाच नव्हे तर प्रत्येक शेकतऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे.प्रत्येक ओबीसी आणि मागासवर्गीयांचा पक्ष आहे.आणि प्रत्येक रंजल्या आणि गांजलेल्यांचा पक्ष आहे.आणि म्हणून प्रत्येकाला वाटलं पाहीजे हा आपला पक्ष आहे… बळीराज सेना.त्याने स्फुर्ती मिळायला हवी.
कोकणातील राजकीय नेते कमकुवत,मिळमिळीत
आज आपण सर्वसाधारण जनतेची काय अवस्था आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.कोकणाचच घेतलं तर जे राजकीय पक्ष आहेत त्यांना जनतेचं काहीही पडलेलं नाही. खासकरून कोकणातल्या जनतेच.कोकणात जे राजकीय नेते आहेत ते फार कमकुवत आहेत.जे मंत्री, संत्री, खासदार जे पण असतील त्यांनी स्वार्थाच्या पलीकडे काहीच केलेलं नाही.त्यांनी स्वार्थ जर पाहीलं नसत तर कोकण उद्धवस्त करणारे प्रकल्प आणलेच नसते.
कोकणच्या माथ्यावर विनाशकारी प्रकल्प
कोकणच्या माथ्यावर फक्त प्रदुषणकारी मारले जात आहेत.नाणार हे गाव आहे.त्या गावाच्या नावाने त्या प्रकल्पाची पुढे वाटचाल चालू झाली होती.तो आँईल रिपायनरी पेट्रो केमिकल प्रकल्प आहे.त्याला तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प म्हणातात.आम्ही जीथे जीथे रिफायनरी प्रकल्प आहे त्या ठिकाणची वस्तुस्थिती पाहीली तर ते किती विदारक होते. आणि त्यावेळीच ठरविले की, कोकणात होणारी रिफायनरी येथे होता कामा नये,त्या प्रकल्पाविरोधात लढायला सुरवात केली.काही लोक आम्हाला विकासाचे मारेकरी म्हणतात.आम्ही विकासाचे मारेकरी नाही.आम्ही जे नालायक लोक नाश करु पाहत आहेत,जे विकासाच्या नावाखाली विनाश करायला निघाले आहेत.त्या राज्यकर्त्यांचे मारेकरी आम्ही आहोत.त्यासाठी आपली ही बळीराज सेना पक्ष काम करणार आहे.कोकण उद्वस्त करणाऱ्यांना उद्वस्त करणार आहोत.
उदय सामंत यांनाही जाहीर आवाहन
दोनचार दिवसात कोकणात प्रकल्पाचे भुमीपूजन होणार असे ऐकिवात आहे.सध्याचे मंत्री उदय सामंत हे बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प रेटण्याचे काम करीत आहेत.तसे ते करीत असतील तर तुमची सत्तेत असलेली तुमची खुर्ची ती खाली करण्याची आणि ती खाली खेचण्याची ताकत या कोकणी जनतेत आहे.हे पुन्हा एकदा दाखवून देवू.रिफायनरी झाल्यास कोणालाही सोडणार नाही. एकप्रकारे सर्वच कोकणाचे वाटोळे करणाऱ्यांना त्यांनी जाहीर आवाहन दिले आहे. आज हे सर्व लोक कोकणाचे वाटोळे करायला निघालेत.त्यांना सोडणार नाही.आज गर्मी किती वाढलीय.प्रदुषण एका बाजूला ठेवा, परंतु ज्या प्रमाणे जागतिक तापमान वाढलेलं आहे ते भयानक आहे.मार्च एप्रिलमध्ये 40 डिग्री सेल्सिअंस इतके तापमान वाढलेले आहे. परवा खारघरमध्ये गरमीने माणसं मेली.ही कोणामुळे हे कोण बघत नाही किंवा कोणी अभ्यास करीत नाही.हे राजकीय लोकं सत्तेत बसलेले आहेत.त्यांच्यामुळेच हे सर्व होत आहे.त्यामुळे रिफायनरी होऊ न देणं हे प्रमुख उद्धिष्ट असणार आहे.