जनशक्तीचा दबाव न्यूज । रत्नागिरी । एप्रिल १०, २०२३.
▪️दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांचे राज्यव्यापी एकदिवसीय भव्य अधिवेशन कोकणातल्या निसर्गरम्य अशा रत्नागिरी शहरात होणार आहे. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, जिल्हा शाखा – रत्नागिरी यांनी अधिवेशनाच्या पूर्वतयारीला मोठ्या उत्साहाने सुरुवात केलेली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांसह विविध मंत्री, शिक्षक महासंघाचे पदाधिकारी, राज्यातील खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
▪️अशा या भव्य अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद रत्नागिरी मतदारसंघाचे माजी आमदार, ‘रत्नसिंधू शिक्षण प्रसारक’ संस्थेचे अध्यक्ष, ‘दि यश फाऊंडेशन’ संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त व रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माननीय श्री. बाळासाहेब माने यांनी स्वीकारले आहे. शिक्षक महासंघाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. दीपक घवाळी, सचिव श्री. सुनील डांगे, सहसचिव श्री. हणमंत ऐवळे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. प्रकाश कदम, तालुका सचिव श्री. प्रवीण मोरे यांनी श्री. बाळासाहेब माने यांची भेट घेऊन मुख्याध्यापक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व अधिवेशनाचे निमंत्रणही दिले.
▪️अधिवेशनाविषयी सकारात्मक चर्चा झाली. श्री. बाळासाहेब माने यांनी अधिवेशनाला स्वखुशीने निधी जाहीर करून अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आणि अधिवेशनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.