बाबो! लग्नानंतर ‘ती’ इन्स्टाग्रामवर प्रेमात पडली; बॉयफ्रेंडला सासरच्या घरी भेटायला बोलावलं अन्…

Spread the love

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडच्या सासरच्या घरी जाणं चांगलच महागात पडलं आहे. याबाबत गर्लफ्रेंडच्या सासरच्या मंडळींना माहिती मिळाली आणि त्यांनी प्रियकराला पकडून ओलीस ठेवलं. हातपाय बांधल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करण्यात आली. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा संपूर्ण खुलासा झाल्यानंतर सासरच्यांनी सुनेला प्रियकरासह माहेरी पाठवलं.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिलवाडा जिल्ह्यातील जहजपूर उपविभागातील गावात राहणारा महेश मीणाची दुसर्‍या गावातील एका विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या विवाहितेने तिचा बॉयफ्रेंड महेश याला इन्स्टाग्राम मेसेज पाठवून सासरच्या घरी बोलावल्याचं सांगितले जात आहे. ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली होती.

गर्लफ्रेंडच्या आमंत्रणावरून महेशही सासरच्या घरी पोहोचला. मात्र विवाहितेच्या सासरच्या मंडळींना ळीं याची माहिती मिळाली. त्यामुळे महेश येताच त्यांनी त्याला पकडलं आणि हात-पाय दोरीने बांधले. त्यानंतर विवाहितेच्या सासरच्या लोकांनी महेशची चौकशी सुरू केली. याचदरम्यान सासरच्यांनी सुनेलाही आपल्यासोबत बसवले जेणेकरून महेश खोटे बोलत आहे की नाही, याची शहानिशा करता येईल.

महिलेच्या सासरच्यांनी महेशला विचारले की तो येथे कोणाच्या सांगण्यावरून आला आहे. चौकशीत सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर विवाहितेच्या सासरच्यांनी महेशला घरच्यांशी बोलायला लावले. अखेर विवाहितेच्या सासरच्यांनी तीच व प्रियकर महेश मीना याचं लोकांच्या उपस्थितीत लग्न लावून दिलं. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page