
मंडणगड (प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन शिक्षण व विस्तार विभागच्या वतीने संयुक्त विद्यमाने ‘जागतिक एड्स’ दिनानिमित्त नुकतेच मंडणगड शहरात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड परिसरात काढलेल्या या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी एड्स जाणा – एड्स टाळा , मै जवान हूं – नादान नही, ये है मेरा वादा आज के दिन, एड्स की जानकारी खुशहाल जिंदगी की सवारी, घरोघरी एकच नारा, एड्सला नाही थारा, करु एड्स निर्मूलन, उपाय एकच प्रतिबंधन अशा प्रकारच्या घोषणा देवून या भयंकर आजारापासून मुक्त रहाण्याबाबत विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उप्रपाचार्य डॉ. विष्णु जायभाये, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप निर्वाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*