राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई -गोवा महामार्गाबाबत रत्नागिरी मनसेची जनजागृती

Spread the love

रत्नागिरी -१७ वर्ष प्रलंबित असणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पनवेल येथे १६ ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर मनसे तर्फे
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलय व मारुती मंदीर परिसरात विविध फलक हातात धरुन मुंबई-गोवा महामार्गाच्या परिस्थितीबाबत जनजागृती करण्यात आली या फलकांद्वारे कोकणी माणसाला आपल्या हक्कासाठी आवाज उठण्याचे आवाहन तर सत्ताधाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.


यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाची अशी अवस्था असताना इतके वर्ष होऊन कोकणी माणूस अजून शांत का आपल्या आमदार- खासदारांना कधीतरी तुम्ही जाब विचारणार का नाही असा प्रश्न उपस्थित करताना मनसे याबाबत आता आवाज बुलंद करत आहे जनतेने आपल्या हक्कासाठी सामील व्हावे असे आवाहन केले तर शहरसंघटक अमोल श्रीनाथ यांनी सत्तेतल्या लोकांचा अहंकार उतरवण्याची आता वेळ आली आहे जनतेनेच याचा विचार करावा असे म्हटले.यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहरसंघटक अमोल श्रीनाथ, शहरसचिव अजिंक्य केसरकर, उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण,महिला उपशहरअध्यक्ष शिल्पाताई कुंभार, विभागअध्यक्ष काका नागवेकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव,विभागअध्यक्ष अखिल शाहू, विभागअध्यक्ष सोम
पिलणकर,विभागअध्यक्ष विजयाताई भाटकर, उपविभागअध्यक्ष वैभव पाटील, शाखाध्यक्ष राहुल खेडेकर,गटअध्यक्ष ऋत्विक बागवे,संजय आग्रे, दिलीप पडवळ, धनंजय पाटील आदी
पदाधिकारी-महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page