जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मार्च २९, २०२३.
गुहागर तालुक्यातील अष्टपैलू सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष जैतापकर यांना सामाजिक क्षेत्रातील विविधांगी सेवेबद्दल नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे. आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात श्री. जैतापकर यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे.
या महोत्सवाचे प्रमुख संयोजक श्री. महेश तेटांबे यांच्या मार्गदर्शनात श्री. अनंत सुतार, श्री. सुरेश डाळे, श्री. मनिष व्हटकर यांनी संतोष जैतापकर यांच्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, साहित्य, काव्य आदी श्रेणींमध्ये असणाऱ्या भरीव योगदानाने प्रभावित होऊन सन्मानपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्री. जैतापकर यांच्या सर्व निकटवर्तीयांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील सहकारी आणि चिरपरिचीत व्यक्तींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.