नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलीस टीमचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.
नेरळ- सुमित क्षीरसागर सोने चांदीचे दागिने आणि पैसे पळवून नेणारा चोर नेरळ पोलिसांच्या हुशारीने काही तासातच पकडला गेला.चोरीच्या ठिकाणीच म्हणजे नेरळ खांडा येथील राहणाऱ्या या स्थानिक तरुणाला नेरळ पोलिसांनी सुरुवातीला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानंतर खाकी दाखवताच चोरीची कबुली दिल्यानंतर या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलीस टीमचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ खांडा विठ्ठल रखुमाई मंदिर येथील दोन मजली घराच्या चाळीत राहणारे महेंद्र दुबे यांच्या घरी गुरुवार
११ जानेवारी रोजी चोरी झाली होती.चोराने घरातील सर्व सोने चांदीचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम चोरली होती.दरम्यान यावेळी घरमालक दुबे यांनी आपल्या घरातील महिलांचे हे सर्व दागिने असून याची किंमत साधारण
१० लाख किमतीचे असावे असा अंदाज लावला होता.आयुष्य भराची ही पुंजी असून लवकरात लवकर चोरांना पकडून आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रथम नेरळ पोलिसांना दुबे यांनी कळवले होते तर प्रसार माध्यमांकडे देखील दुबे यांनी व्यथा मांडली होती.महेंद्र दुबे हे राहत असलेल्या घराचे काम सुरू असल्याने त्यांनी बाजूला असलेल्या खोलीत राहण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान ज्या वेळी चोरी झाली त्यावेळी केवळ दाराचे कुलूप हे उघडून नंतर फोडण्यात आल्याचे चित्र होते,शिवाय दोनच बॅग ह्या उघडण्यात आल्याचे दिसून आले होते,पोलिसांनी ज्यावेळी घटनास्थळी पाहणी केली त्यावेळी ह्या गोष्टी प्रामुख्याने समोर आल्याने चोर हा बाहेरचा नसून तो या माहितीतील स्थानिक असल्याचा अंदाज नेरळ पोलिसांनी लावला होता.दरम्यान नेरळ पोलिसांनी यावेळी नेरळ खांडा येथील अविनाश राठोड या तरुणाला चौकशी साठी ताब्यात घेतले होते, सुरुवातीला आपण चोरी केली नसल्याची त्याची बतावणी होती परंतु पोलिसांना राठोडचा बोलण्यात संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आल्याने त्याने घटनेची कबुली दिल्याचे समजतंय.दुबे राहत असलेल्या चाळीत राठोड यांची रूम असून ती रूम दुबे यांनी सामानासाठी घेतली होती अखेर याच माहितीचा वापर करीत चोरी केल्याचे समोर आलं.