पहिल्याच संधीत राज्याच्या अर्थसंकल्पातून अमृतधारांचा देवेंद्रजीनी वर्षाव केला – ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भा.ज.पा.रत्नागिरी.
रत्नागिरी : शिक्षणासाठी १ लाख २६६ कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा हि अमृतवर्षावासारखी आहे.
शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही भरीव योजना या अर्थसंकल्पात दिसतात. १ रुपयात पिक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. पिक विम्याच्या हप्त्याची पूर्ण रक्कम राज्य शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना अधिकचे ६००० या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. मागेल त्याला शेतमळे प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनामे ई पंचनाम्या माध्यमातून होणार असल्याच अंदाज पत्रकात घोषित केले आहे. कोकणासाठी काजू फळ विकास योजना सुरू करण्यात येत आहे. रत्नागिरीतील काजू व्यवसायिकांना नवी संधी यातून उपलब्ध होईल. काजू प्रकल्पासाठी ३६००० कोटी अनुदान जाहीर झाले आहे. पारंपारिक मच्छीमारांसाठी ५ लाख विमा कव्हर देण्याचे घोषित केले आहे. याचा लाभ रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमारांना होणार आहे.
रत्नागिरी अंदाजपत्रकात
रत्नागिरी मध्ये सर्क्युलर इकॉनोमी पार्क घोषित झाले आहे. रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार ही घोषणा महत्त्वपूर्ण आहे.
समाजमित्र घटकांना अमृत मात्रा
अंगणवाडी सेविकांचे मानधन १०,०००/- करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय. कोतवालांचे मानधन १५०००/- करण्याचा निर्णय शिक्षक सेवकांच्या मानधनात केलेली वाढ.
महिला शक्ति साठी अमृतधारा
महिलांना व्यवसाय करात दिलेली सवलत, बचत गटातील उत्पादकांसाठी मुंबईमध्ये युनिटी मॉल सुरू करण्याची घोषणा महत्त्वपूर्ण आहे. महिलांना एस.टी प्रवासात ५० टक्के सवलत देतानाच लेक लाडकी योजना प्रभावी करत सज्ञान मुलीला सज्ञान होताच ७५ हजार रोख दिले जाणार असल्याची घोषणा खूप उपयुक्त ठरणारी व स्त्रीच्या भवितव्याची काळजी घेणारी योजना ठरेल.
आरोग्य सुविधाना प्राधान्य
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार खर्चाची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढवतानाच २०० नवी रुग्णालये या योजनेसाठी पात्र करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही वाढीव मर्यादा अमृतदायी ठरणार आहे. आरोग्य विभागासाठी ३ हजार ५०० कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधा अग्रक्रमाने
पायाभूत सुविधांबाबत फडणवीस जागृत आहेत हेही या अर्थसंकल्पाने दाखवून दिले आहे. समृद्धी महामार्गाचे ८८% काम पूर्ण होत असताना या योजनेचे विस्तारीकरण अनेक उड्डाण पूल निर्मिती असे अनेक प्रकल्प या अंदाजपत्रकात दिसतात.
मेट्रो चे जाळे विमानतळ ना नव्या सुविधा.
हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात अमृतधारा बरसल्याप्रमाणे अनुभव देणारा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गतिमानता देणारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणं महाराष्ट्राच्या विकासाची यशोगाथा साकार होण्यासाठी प्रशस्त पदपथ साकारणारा हा अर्थसंकल्प आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, महिला, युवा, उद्योग, शेती अशा प्रत्येक घटकाचा मागोवा घेत प्रत्येक घटकावर अमृताभिषेक करणारा हा अर्थसंकल्प आहे.अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली