संगमेश्वर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीच्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांचे मार्गदर्शन, सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांना मित्र मानावे…

Spread the love

संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर पोलीस ठाणे येथे दुपारी शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर,  पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण तसेच शांतता कमिटीचे सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
     

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे वतीने पो.नी.राजाराम चव्हाण यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की येथे कायद्याचे काम करणारे लोक आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांबद्दल भीती न बाळगता त्यांना आपले मित्र समजले पाहिजे.

महामुनी पुढे म्हणाले की,“गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला पाहिजे आणि आमचा प्रयत्न नेहमी न्याय देण्याचा राहणार आहे. कायदेशीर मार्गाने, जनतेच्या समस्या ऐकून, सकारात्मक भूमिका घेणे ही आमची जबाबदारी आहे.” त्यांनी जातीय तणाव पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी दिला. “समस्या बिनधास्त मांडा, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून चांगले काम करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.


       

ते पुढे म्हणाले गुन्हेगारांना कायद्याला धाक राहिला पाहिजे आणि आमचा प्रयत्न नेहमी न्याय मिळवून देण्याचा असतो. जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र जातीय तणाव पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे अप्पर पो.  अधीक्षक यांनी प्रतिपादन केले.


     
पोलिसांनी स्थानिक लोकांशी समन्वय ठेवून शांतता व सुव्यवस्था स्थिर राखण्यासाठी जनतेचा सहभाग वाढवावा असा संदेश बैठकीतून देण्यात आला.
    

संगमेश्वर व्यापारी संघटनेचे अभय शेठ गद्रे, सुशांत कोळवणकर, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष खातू, गुरुप्रसाद भिंगार्डे , मापारी मोहल्ला संघटनेचे अध्यक्ष रऊफ खान,  संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वहाब दळवी,  विविध संघटनांचे पदाधिकारी,  जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार इजाज पटेल,  इलियाज मापारी,  दीपक तुळसणकर,  नियाज खान,  पोलीस अंमलदार महिला पो. अंमलदार अधिकारी, माजी सभापती सुजित महाडिक,  श्रीप्रकाश कोळवणकर आदी बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page