
डिजीटल दबाव वृत्त
गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यानंतर अयोध्येत दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यापाठोपाठ आता काशी व मथुरा येथील मंदिरांचा मुद्दाही जोरकसपणे मांडला जात असून ज्ञानवापी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशीदची एक वीट राज ठाकरेंना भेट म्हणून दिली.
बाळा नांदगावकरही तेव्हा अयोध्येत होते!
बाबरी मशीद पडली तेव्हा अयोध्येतील कारसेवेत बाळा नांदगावकर यांचा समावेश होता, असे राज ठाकरे म्हणाले. “बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचं वजन जास्त होतं. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“तेव्हाची बांधकामं का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटं निघायची नाहीत”, अशी मिश्किल टोला राज ठाकरें यांनी लगावला.
राज ठाकरेच आमच्यासाठी बाळासाहेब – बाळा नांदगावकर
जाहिरात


