मुंबई :- मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काही इमारती कोसळल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मात्र मुंबईतील चेंबूर परिसरात रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ता खचून झालेल्या खड्ड्यात तब्बल ४० ते ५० दुचाकी आणि कार कोसळल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आह.
चेंबूर येथील प्रियदर्शनी मधील वसंत दादा पाटील इंजिनियर कॉलेज समोरील राहूल नगर दोन इथे एसआरएस बिल्डिंग समोर जागा खचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यांनंतर आजूबाजूच्या बिल्डिंग मधील नागरिकांना बाहेर काढत संपूर्ण बिल्डिंग खाली करण्यात आल्या. यादरम्यान या बिल्डींगमधील नागरिकांची ४० ते ५० वाहने खचलेल्या खड्डयात कोसळले.
रस्ता खचताच आसपासच्या इमारतींमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. मात्र स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्ड्यात पडली. पोलिस, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱी घटनास्थळी रवाना झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.