
ठाणे : निलेश घाग ठाणे येथील चाळके महाराज जागृत देवस्थानयेथे मंगळवारी दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री.गुरू दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
“दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंरा” च्या गजरामध्ये चाळके महाराज देवस्थान ठाणे येथे सायंकाळी ६:०० वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदीर परीसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली. आज दत्त जयंती निमित्ताने ठाणे शहरातून अनेक भाविक दाखल झाले होते. पहाटे ५ वाजल्यापासुन दत्त मंदीरामध्ये गर्दी झाली होती. श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदीर परीसर फुलांनी बहरून गेला.

देवस्थान समितीचे चाळके महाराज कुटुंबीय व दत्त जयंती उत्सव समिती आदींनी भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली होती.
पहाटे काकड आरती, मंगल आरती दुपारी महापुजा, नैवद्य, महाआरती झाली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. श्री दत्त जन्माचे किर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदीरामध्ये संपन्न झाले. सायंकाळी साडेपाच वाजता श्री दत्त जन्मकाळ व आरती झाली. दत्त जयंती निमित्त मंदिरामध्ये व मुख्य गाभार्यास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.
दत्त जयंती कार्यक्रमास महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार राजन विचारे साहेब आमदार संजय केळकर साहेब ठाणे परिवहन अध्यक्ष विलास जोशी साहेब शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार शिंदे साहेब माजी नगर सेवक विकास रेपाळे भरत चव्हाण संजय तरे माजी नगरसेविका मीनल संख्ये नम्रता फाटक महेश्वरी तरे नम्रता भोसले शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार साहेब माथाडी नेते राजेंद्र सुर्वे साहेब यांची उपस्थिती होती. रमेश चाळके (आप्पा) अवधूत चाळके , सुरेश चाळके आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थीत होते.
जाहिरात


