देवरुख पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक दिपक पवार शौर्य पदकाने सन्मानित ,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याहस्ते गौरव…

Spread the love

देवरूख- रत्नागिरी पोलीस दलातील देवरूख पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व खंडाळाचे सुपुत्र दिपक शांताराम पवार यांना पोलिसातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल सन्मान पदक व प्रशस्तिपत्र पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पोलीस दलात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात येते. दिपक पवार यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले  होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उप अधिक्षक जयश्री गायकवाड व पवार यांचे कुटुंबीय उपस्थिती गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे काम केले आहे. गेली ४ वर्ष देवरूख पोलीस ठाण्यात सेवेत सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक तपास केलेल्या गंभीर गुन्हा मध्ये आरोपींना शिक्षा लागलेली आहे. अनेक फरारी आरोपी पकडले असुन अनेक गंभीर गुन्हे ची उकल केली आहे. दिपक पवार हे पुढील महिन्यात ते सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीपुर्वी त्यांना शौर्य पदक प्रदान करण्यात आल्याने देवरूख सह संगमेश्वर तालुका व जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page