नेरळ: सुमित क्षीरसागर
सध्या अनेक आजारांनी डोकेवर काढले आहे त्यामुळे नागरिकांना स्वस्त व मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आपण स्वतः सह पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात आयुष्यमान भारत ही योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे. नेरळ शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नोंदणी अभियान व आयुष्यमान भारत कार्ड, तसेच गणेश सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे बोलत होते.
कर्जत तालुक्यातील शिवसेना शहरप्रमुख प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज नेरळ शहरात गणेश सजावट स्पर्धा, तसेच नवीन मतदार नोंदणी अभियान व आयुष्यमान भारत कार्ड योजना या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवा दरम्यान शहरात शिवसेनेच्या वतीने गणेश सजावट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
त्याचे पारितोषिक वितरण सोहळा आज नेरळ येथिल धारप सभागृहात आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनेकानी विविध पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे स्वागत आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. तसेच शिवसेनेत प्रवेशकर्त्यांचा नेहमीच सन्मान केला जाईल, अशी ग्वाही प्रवेशकर्त्यांना आमदार थोरवे यांनी दिली. तळागाळात शासनाच्या विविध योजना सरकारचा आमदार म्हणून पोहोचविण्यास कटिबद्ध आसल्याचे प्रतिपादन येथे केले. तसेच तालुक्यात विविध विकास कामे करताना कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन शासनाच्या योजना पोहोचवा असे आवाहन शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. तसेच या कार्यक्रमात विविध महिलांची पदांवर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संघटक शिवराम बदे, ज्येष्ठ शिवसेना नेते गजुभाई वाघेश्वर, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य संतोष शिंगाडे, धर्मानंद गायकवाड, गीतांजली देशमुख, उमा खडे, जयश्री मानकामे, शिवाली पोतदार, यूवा पदाधिकारी ऋषिकेश पाटील, सुरेश राणे, महिला शिवसेना पदाधिकारी जान्हवी साळुंखे युवा नेते प्रसाद थोरवे, शिवसेनेचे अंकुश दाभणे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश शेळके, युवानेते सचिन खडे, मनोज मानकामे, आदि पदाधिकारी येथे उपस्थित होते. नेरळचे शिवसेना शहरप्रमुख प्रभाकर देशमुख यांनी येथे उपस्थितांचे स्वागत केले.