
दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी पुलावरील डांबरी रस्ता जेसीबीने उकरून दुरुस्तीचे काम सुरू आहे . या रस्त्याची खडी – माती खाडीतील पाण्यात टाकली जात आहे . थेट खाडीत टाकली जात असलेली ही खडी – माती थांबवावी , अशी मागणी जागरूक मच्छीमार गणेश चौगुले यांनी केली . तसेच त्या कामगारांना खाडीत खडी – माती न टाकण्याच्या सूचना दिल्या . संबंधित विभागाला तत्काळ कळवताच प्रशासनाने चौगुले यांच्या मागणीची गंभीर दखल घेतली .