
ठाणे : “आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाहीत. पण रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्र फेरीवाला मुक्त असलेच पाहिजे. त्यासाठी आमचे आंदोलन आहे. तुमच्या पुनर्वसनासाठी आम्हीही आग्रही आहोत अशा शब्दात त्यांनी फेरीवाल्यांना सुनावले.”
आमच्यावर उपासमारीची वेळ का आणली. आम्हाला हटवून रिक्षा स्टँड उभारताय त्याचे अतिक्रमण होणार नाही का? आमच्यात आणि रिक्षावाल्यांमध्ये भांडण लावू नका अशा शब्दात फेरीवाल्यांनी मनसेचेडोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांना सुनावले. घरत यांनीही फेरीवाल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाहीत. पण रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्र फेरीवाला मुक्त असलेच पाहिजे. त्यासाठी आमचे आंदोलन आहे. तुमच्या पुनर्वसनासाठी आम्हीही आग्रही आहोत अशा शब्दात त्यांनी फेरीवाल्यांना ऐकवले.
पुर्वेकडील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रातील फेरीवाले हटविल्यांनतर त्याठिकाणी मीटर रिक्षा स्टँड प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या सूचनेनुसार मनसे शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी सोमवारी संध्याकाळी अधिका-यांसमवेत डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरील पुर्वेकडील परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना संतप्त फेरीवाल्यांनी घेराव घालत जाब विचारला. जो फेरीवालोंकी बात करेगा, वही डोंबिवली मे राज करेगा असा नारा दिल्याने फेरीवाल्यांनी एकप्रकारे मनसे सह अन्य राजकीय पक्षांना आव्हान दिल्याची चर्चा रंगली होती. मनसेच्या दौ-याच्या दरम्यान रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि आरटीओ, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.