
नवी दिल्ली- ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या घटनेवरून विरोधी पक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याला आता अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ही राजकारण करण्याची वेळ नाही,” अशा शब्दांता अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांनी फटकारलं आहे.

“ही राजकारण करण्याची वेळ नाही. बचावकार्यावर आमचं लक्ष आहे. पूर्ण ताकदीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देत आवश्यक सूचना दिल्या आहे. घटनेची चौकशी करून १५ ते २० दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल,” अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.