
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- पावसाळ्याला यंदा लवकर सुरुवात झाली आहे. गणपती कारखानदारांची गणपती माती कामाला मे महिन्यातच आरंभ झाला. यावर्षी गणेश उत्सव पर्वाला दिनांक २६ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे त्यामुळे गणपती कारखानदारांची मातीकाम व रंगकाम यांची लगबग सुरू झालेली दिसत आहे. कोकणातील महान चित्रकार व उत्कृष्ट रांगोळी कार तसेच गणपती बाप्पाच्या डोळ्यांचे उत्कृष्ट रेखणीकार देवरुख चे कलाकार विलास विजय रहाटे मुळगाव मुर्तवडे यांनी देखील गणपतीचे रंगकाम व रेखणीला आरंभ केला आहे. दरवर्षी त्यांना बोलावलेल्या विविध कारखान्यात जाऊन 6500 ते 7000 पर्यंत मूर्तीचे रंगकाम रत्नागिरी जिल्ह्यात तसेच बाहेर देखील करतात.
रांगोळी नंतर गणपती बाप्पांचे डोळे रंगवण्याचे काम ते अंतकरणापासून आजपर्यंत करत आले आहेत.या वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कलेच्या अदाकारीमुळे ते विविध राज्य पुरस्काराने सन्मानित देखील झाले आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला आहे.यंदाच्या वर्षी गणपती बाप्पांचे रंगकाम निर्विघ्नपणे पार पडावे अशी प्रार्थना देखील त्यांनी गणरायांना केली आहे.