वीटभट्टी वर राबणाऱ्या आदिवासी समाजातील अंजलीच्या हाती लेखणी येताच तिची तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भरारी….

Spread the love

कर्जत: सुमित क्षिरसागर – कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भागात असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या झुगरे वाडी शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या अंजली भास्कर वाघ या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मोलाची कामगिरी बजावली आहे. तर या विज्ञान प्रदर्शनात अंजलीने तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अंजली हिने तिच्या विज्ञान प्रकल्पाचे उत्कुष्ठपणे सादरी करण केल्याने, आयोजकांनी अंजलीच्या पाठीवर  कौतुकाची थाप देत तिचे मनापासुन कौतुक ही केले आहे.  इतर विद्यार्थी यांच्या तुलनेत अंजली हिने तालुका,जिल्हा प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय प्रदर्शनात आपल्या विज्ञान प्रकल्पाचे उत्कृष्ट सादरीकरण करत आपल्या शाळेचे व शिक्षकांचे तसेच गाव व तालुक्याचे नांव लौकिक केल्यामुळे अंजली हिचे सर्व स्तरावरू कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

रायगड जिल्हयाचे शेवटचे टोक व कर्जत तालुक्यातील अती दुर्गम बहुलभाग असलेल्या झुगरेवाडी येथील कु.अंजली भास्कर वाघ ही काही काळ शाळाबाह्य होती. मात्र ती हुशार असूनही केवळ परिस्थितीमुळे तीला तीच्या आई वडिलांसोबत वीटभट्टी वर जावे लागले होते, अंजली ही हुशार असल्याने,  झुगारेवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रवी काजळे व सतीश घावट यांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तुमची मुलगी हुशार आहे तिला कृपया शाळेत पाठवा असे सांगितल्या प्रमाणे वडिलांनी ही शिक्षकांचे म्हणणे ऐकून तिला शाळेत पाठवण्यास सुरू केले, शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने अंजलीला अभ्यासाची व शाळेची आवड निर्माण झाली, यातूनच विज्ञान शिक्षक राजश्री पाटील व नंदादीप चोपडे यांनी तिच्यावर विश्वास ठेवून रस्ते सुरक्षा या प्रकल्पासाठी तिची तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली, आपल्या प्रभावी वक्तृत्वाची चमक दाखवत अंजलीने तालुका व जिल्ह्यात आदिवासी गटातून प्रथम क्रमांक मिळवत, अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान विद्यालय येथील आयोजित राज्यस्तरीय ५२ व्या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला, झुगरे वाडी शाळेच्या स्थापनेपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ  त्यामुळे तिने मिळविलेले यश हे उल्लेखनीय आहे. अंजली हिला जर शिक्षकांनी शालेत आणले नसते तर शाळा आशा एका गुणी विद्यार्थिनी मुकली असती. असे झुगरे वाडी येथील रायगड जिल्ह परिषद शाळेतील शिक्षकांकडून उदगार काढण्यात आले आहे.

प्रतिक्रिया…..

सुरुवातीला मी काही दिवस शाळेत व काही दिवस वीटभट्टी वर असा माझा प्रवास सुरू होता. इच्छा असूनही मला शिकता येत नव्हते परंतु मुख्याध्यापक रवी काजळे यांनी माझ्या वडिलांना सांगून मला शाळेत आणले त्यामुळे मला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होता आले. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे व माझ्या पालकांची खूप आभारी आहे.

:- अंजली वाघ, विद्यार्थिनी, रायगड जिल्ह परिषद शाळा झुगरे वाडी.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page