
मुंबई लोकलच्या घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मोकळ्या जागेत अडकून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे…..
मुंबई/ प्रतिनिधी- लोकल येताच प्लॅटफॉर्मवरील व्यक्ती चक्कर येऊन पडल्यानं प्लॅटफॉर्म अन् डब्याच्या शिडीत अडकला, पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्टा पण प्रवाशानं जीव गमावला चालत्या लोकलमधून उतरणं प्रवाशाच्या जीवावर बेतलं
मुंबई : मुंब्रा येथील लोकलमधून पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एक दुर्घटना घडली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत अडकून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. साधारणपणे ही घटना एक तासांपूर्वी घडली आहे.संबंधित व्यक्तीचा तोल गेल्यानं तो प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या जागेत अडकल्यानंतर त्याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीएसआय कपिले आणि पीएसआय खोत हे पोलीसअधिकारी घाटकोपर रेल्वे स्टेशन येथे गुन्हे प्रतिबंधक कामासाठी हजर होते. सुमारे 07: 44 वाजता परेल वरून ठाण्याला जाणारी स्लो लोकल 07-58 वा.घाटकोपर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली असता मोटरमन यांनी कल्याण बाजू कडील नवीन ब्रीज खाली एक प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभा असताना त्याला अचानक चक्कर आल्याने तो नमूद गाडीच्या 1 नंबरच्या डब्याच्या शिडी व प्लॅटफॉर्म मध्ये पडल्याची माहिती दिली तो अडकून जखमी स्थितीत अत्यावस्थ झाल्याने सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवासी जमा झाले होते.यावेळी उपस्थित पोलीस स्टाफ, होमगार्ड,आरपीएफ स्टाफ यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.
पोलीस अंमलदार यांना पोलीस उपनिरीक्षक कपिले,पोलीस उपनिरीक्षक खोत यांनी स्टेशन मास्तर आणि मोटरमन यांना गाडी हलवू नये अशा सूचना दिल्या.यानंतर पोलीस अंमलदार हेड कॉन्स्टेबल चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कदम,पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे,होमगार्डआरोटे,पोलीस कॉन्स्टेबलआरागडे यांना गाडी खाली पाठवून त्यास गाडी खालून सरळ धरले. पोलीस निरीक्षक कपिले,खोत आणि आरपीएफ स्टाफ यांनी त्यास प्लॅटफॉर्म मधून काढून रेस्क्यू करून त्याला वाचविण्यासाठी छातीवर सतत पंपीग केले.पण त्यानं हालचाल केली नाही.
पुढील औषधोपचार करणेकामी पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे यांच्या ताब्यात देऊन ऍम्ब्युलन्स ची वाट न पाहता खाजगी रिक्षाने राजावाडी हॉस्पिटल येथे रवाना केले. मृत व्यक्तीचं नाव संजय जगजाप्पा मातंगे वय -51 रा.बदलापूर असं आहे. त्याचे कडील ओळखपत्रावरुन तो 100 टक्के अंध असावा त्याचे कडे आर्मी कॅन्टीन चे कार्ड मिळाले आहे, अशी माहिती आहे. पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती आहे.
घाटकोपर स्टेशन येथे उपस्थित असलेले सर्व पोलीस अंमलदार हेडकॉन्स्टेबल चव्हाण, महाराष्ट्र पोलीस शिपाई फरांदे, महाराष्ट्र पोलीस शिपाई बांबळे , महाराष्ट्र पोलीस शिपाई निमगिरे सर्व होमगार्ड व प्रतिबंधक कामी हजर असलेले सर्व अंमलदार व आरपीएफ स्टाफ यांच्या सहाय्यानं गर्दीवर नियंत्रण करून संबंधित व्यक्तीला रेस्क्यू केले. त्यानंतर गाडी 20-10 वा.ठाण्याकडे रवाना झाली आहे.पोलिसांकडून मातंगे यांच्या वारसाचा शोध सुरु आहे.
प्रवाशांनी देखील काळजी घेण्याची गरज…
मुंब्रा येथील घटना ताजी असताना घाटकोपर रेल्वे स्थानकावर देखील दुर्घटना घडली आहे. चालत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्यानंतर मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे 9 जूनला एक दुर्घटना घडली होती. लोकलच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी एका प्रवाशाची बॅग पुष्पक एक्स्प्रेसला घासल्यानं इतर प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले होते.