🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 राजापूर | जानेवारी ३१, २०२३.
◼️ राजापूर तालुक्यातील सागवे गोठीवरे परीसरात शनिवारी लागलेल्या वणव्यात येथील जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या असून सुमारे ३० ते ३५ लाख रूपये नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखुन काही बागायती वणव्यापासून वाचविल्या. अन्यथा याहून मोठे नुकसान झाले असते. वणवा कसा लागला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
◼️ शनिवारी सकाळी अंदाजे १०:०० वा. पासून गोठीवरेच्या परसिरात मोठा वणवा लागला होता. हा वणवा गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यत सुमारे ५ किमी हा वणवा पसरला असल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परीसरातील सुमारे ३५ शेतकऱ्यांची धरती असलेली कलमे जळून खाक झाल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे. यामुळे सुमारे ३० ते ३५ लाख रूपये नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील काही शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे बागायतींवरच अवलंबून असते. बागायती वणव्यामध्ये जळून गेल्याने त्यांच्या समारे वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.