
नागपूर | महाराष्ट्रातील नागपुरातील खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान, भाजप नेत्याच्या मुलाने क्रिकेट सामन्यादरम्यान पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने क्रिकेट सामन्यादरम्यान पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. भाजप नेत्याच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने हा महोत्सव तुफान चर्चेत आला आहे.
छत्रपती चौकात खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघांमध्ये सामना झाला. यापैकी एका संघात मुन्ना यादवची मुले अर्जुन आणि करण यांचा समावेश होता. सामन्यादरम्यान अर्जुनने थ्रो बॉलवरून पंचांशी वाद घातला. रेफरीने त्याला समजावले, पण मुन्ना यादवचा मुलगा अर्जुन आपल्या निर्णयावर ठाम होता. मात्र, पंचांनी निर्णय बदलण्यास नकार दिल्याने भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने मारामारी सुरू केली. मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात सध्या खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.