
गौरव पोंक्षे/ संगमेश्वर- पनवेल-कन्याकुमारी सुरू असलेल्या रस्ता चौपदरीकरणा च्या कामाचा फटका सध्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावाला बसताना दिसत आहे.आरवली गाव म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येत ते ऐतिहासिक गरंम पाण्याची कुंड,सध्या हीच गरम पाण्याची कुंड,रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे समस्यांचा गर्तेत सापडले आहे.
या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे गरम पाण्याची कुंडे,चिखलाने भरून गेली आहेत.आजूबाजूची सगळी ढीगाऱ्यांची माती या कुंडात वाहून आली आहे.सध्या हे ऐतिहासिक ठिकाण चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले आहे.
ठेकेदाराने खर तर मे महिन्यांपूर्वी हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची गरज होती.परंतु रेंगाळलेल्या कामाचा फटका सध्या गरम पाण्याच्या कुंडाला बसला आहे.
गरम पाण्याच्या कुंडावर अनेक लोक दररोज अंघोळ करतात.शिवाय गंधकयुक्त पाणी असल्याने ,हे पाणी त्वचा विकार दूर होण्यासाठी अनेक लोक स्नानासाठी आवर्जून घेऊन जातात.त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असलेले गंधयुक्त पाणी निसर्गतः आरवली येथे उपलब्ध असल्याने या गरम पाण्याच्या कुंडांना विशेष महत्व आहे.व गरम पाण्याच्या कुंडामुळे आरवली गावाला ओळख ही आहे.शेकडो पर्यटक,सहली, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी याठिकाणी आवर्जून येतात.
आरवली ची ओळख असलेल्या या गरम पाण्याच्या कुंडाकडे ,रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बकालीकरण व थेट कुंडांच्या अस्तित्वालाच धोका पोहचत आहे.
या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष द्यायला हवे,अशी मागणी गेले कित्येक दिवस गावातून होत आहे.