
*आरवली-* संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते माखजन या मुख्य रहदारीच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. या मार्गावरील कोंडीवरे, बुरंबाड, सरंद या ठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

मात्र हे खड्डे बुजविण्याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोंडीवरे येथील खड्ड्यांमध्ये मागेच एका दुचाकी स्वाराचा अपघात होऊन हात निकामी झाला होता. तसेच या मार्गावरून दररोज लहान मुलांचा शाळेसाठी प्रवास सुरू आहे. अवघ्या काही दिवसावर गणेशाचे आगमन होणार आहे. येणारा चाकरमानी खट्यातून घरी येणार का? असा प्रश्नही केला जात आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग खडतर होत चालला आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*