कल्याण : शहरातील अनधिकृत बांधकामे शासनाच्या धोरणानुसार अधिकृत करण्याबाबतच्या निर्णयाबाबत एम सी एच आय (MCHI) संघटनेने आज भूमिका स्पष्ट केली. अधिकृत बांधकाम करणाऱ्यालाच पालिकेने मान्यता दिली पाहिजे अशी मागणी करत अनधिकृत बांधकाम करून त्यानंतर त्याला मान्यता दिली जाणार असेल तर अधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकावर त्याचा परिणाम होणार आहे.
याबाबत एम सी एच आय या बिल्डर संघटनेतर्फे पालिका आयुक्तांना पत्र देणार असल्याचे सांगितले. एमसीएचआयतर्फे कल्याण मध्ये प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवण्यात येणार आहे. या एक्झिबिशन बाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली, या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष रवी पाटील अध्यक्ष भारत छेडा दिनेश मेहता रोहित दीक्षित हे उपस्थित होते.
अखेर आयुक्तांनी मौन सोडले…
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जातील या चर्चेने कल्याण डोंबिवलीकरांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर याबाबत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्टीकरण देत अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट केलीय. शासनाच्या धोरणाप्रमाणे या बांधकांमाबाबत निर्णय घेतला जाईल, शिवाय ज्या बांधकामांचा संदर्भात न्यायलायची आदेश आणि परवानगी आवश्यक आहे त्या बाबींची पूर्तता केली जाईल असं बांधकामसंबंधी निर्णय घेतला जाईल असं आयुक्तांनी म्हटलं आहे.