भारतीय जनता पार्टी द. रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. सुजाता साळवी यांची नियुक्ती…

Spread the love

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. सुजाता सरलकुमार साळवी यांची नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सर्व स्तरातून सौ. सुजाता साळवी यांचे अभिनंदन होत आहे. गेली अनेक वर्ष त्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत आहेत. तर त्यांनी रत्नागिरी शहर नगरसेव पदासाठी निवडणूकही लढलेली आहे.

भाजप महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होताच प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, माझी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण जिल्हाअध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरील नंबर एकचा पक्ष आहे याचा मला अभिमान आहे. गेले २७ वर्ष मी भा.ज.पा मध्ये काम करतेय आज मला जिल्ह्यातील महीलांसाठी नेतृत्व करण्यासाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.

माझी निवड करण्यात मा. सौ. चित्राताई वाघ भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच माझे राजकारणातले सहकारी विधानसभा रत्नागिरीचे माजी आमदार श्री बाळासाहेब माने आणि जिल्हा अध्यक्ष श्री राजेश सावंत यांना मनापासून धन्यवाद देते मी माझ्या कामा प्रती प्रामाणिक राहून जास्तीत जास्त महिलांना संघटित करुन भाजप चे वर्चस्व जिल्ह्यात निर्माण करेन.

महिलांच्या संघटनासाठी काम करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महिलांचे संघटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांना करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. असे नूतन महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी यांनी म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page