संगमेश्वर भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी सौ. शीतल दिंडे यांची नियुक्ती.

Spread the love

सौ. शीतल दिंडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना महिला मोर्चा (रत्नागिरी द.) जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार व अन्य पदाधिकारी.

जनशक्तीचा दबाव न्यूज | माखजन | एप्रिल १३, २०२३.

संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावच्या सौ. शीतल सचिन दिंडे यांची स्थानिक पातळीवरील सामाजिक क्षेत्रातील प्रभावी कामगिरी पाहून भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी जि. प. आणि पं. स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धामापूर जि. प. गटात जोरदार मुसंडी मारण्यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचे चित्र यामुळे स्पष्ट होत आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे, देवरुख नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष श्री. अभिजित शेट्ये, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. सुशांत मुळ्ये, युवा मोर्चा अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम सभापती श्री. राजेंद्र गवंडी, माजी शहराध्यक्ष श्री. सुधीर यशवंतराव, नगरसेवक श्री. यशवंत गोपाळ, सामाजिक माध्यम संयोजक श्री. अमोल गायकर, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. दिलीप नटे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सौ. शीतल दिंडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यानंतर मनोगत व्यक्त करताना सौ. दिंडे म्हणाल्या, “देशाचे नेते मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य मी समजत होते. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला सन्मान दिला जातो हे आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. सौ. कोमल ताईंनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपाध्यक्षपदी निवड करून माझी जबाबदारी वाढवली आहे. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी माझ्याकडून संपूर्ण समर्पित कार्य करण्याचा प्रयत्न करेन. आणि यामाध्यमातून पदाची आणि पक्षाची गरिमा उंचावण्यासाठी कटिबद्ध राहीन. सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून हे पद बहाल केले आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे.”

सौ. शीतल दिंडे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या गावी आंबव पोंक्षे येथे आनंदाचे वातावरण आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🛵१ एप्रिलपासून किमती वाढण्यापूर्वी खरेदी करा.🛵
💰Low Down Payment 3,333/-🤩
🥳Low Rate of Interest 6.90%
नियम व अटी लागू
🛵आजच आपली टीव्हीएस बाईक घरी घेऊन चला…!🤩🛵
AUTHORISED MAIN DEALER
—➡-🛵– RK TVS–🛵-⬅—
📌Plot No. 42, MIDC Mirjole, J. K. Files, Ratnagiri.
📲77966 96808
📲77220 45808
📲78880 13808
📲74474 18808
📲77200 53808
📌LANJA : Near Shreeram Bridge, Mumbai – Goa Road, Lanja 📲7020842743

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page