
उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगरात भाजपा व्यापारी सेल च्या काही पद नियुक्त्या करण्यात आल्या
असुन या मध्ये फॉलवर लाइन चौक ते नेहरू चौक रोड आणि आजु बाजु च्या परिसरात होम नारायण वर्मा हे सक्रय असल्यामुळे त्यांना उल्हासनगर भाजपा व्यापारी सेल च्या उपाध्यक्ष पदावर नियुक्त केल्याची घोषणा व्यापारी सेल चे जिल्हाध्यक्ष जगदिश तेजवानी यांच्या उपस्थितीत पद देण्यात आले तसेच उल्हासनगर ३ मध्ये फॉलवर लाईन चौक ते नेहरु चौक या परिसरात होम नारायण वर्मा हे सक्रिय असुन त्यांनी अनेक व्यापार्याना मदत केली आहे उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन समितीवर ते अध्यक्ष सुध्दा होते. तर त्यांनी फॉलवर लाईन शॉप किपर असोशिएशन चे कार्याध्यक्ष पद सुध्दा सांभाळले होते. तेव्हा या कार्याची दखल घेत उल्हासनगर BJP व्यापारी सेल चे अध्यक्ष जगदिश तेजवानी यांनी होम
नारायण वर्मा यांची व्यापारी सेल च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. वर्मा यांच्या नियुक्तीनी स्थानिक तसेच व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी उल्हासनगर भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी , दिनेश कुंग , जयकिशन तिलोकानी, दिनेश मीरचंदानी , समाजसेवक हीरो राजाई , सुंदर सचदेव , अशोक गुरनासिंघानी , गणेश जगवानी नरेंद्र मोतीरामानी , सुनिल भोईर , तेजेन्द्र सिंह, दीपक सोनावणे , केबी चौधरी यांच्यासह अनेक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात


जाहिरात

