अनुप मोरे भाजयुमोचे नवे प्रदेशाध्यक्ष:राहुल लोणीकर सचिवपदी; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली नियुक्ती…

Spread the love

मुंबई- भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनुप मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मोरे यांना नियुक्ती पत्र दिले. मूळचे पिंपरी चिंववड येथील असलेले मोरे यापूर्वी प्रदेश सरचिटणीस या पदावर होते. त्यांनी अनेक सामाजिक व विद्यार्थी आंदोलने केली आहेत.

यापूर्वीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्याकडून भाजयुमोचे प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत मोरे यांनी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.

गेली 22 वर्षे मोरे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे काम करीत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात त्यांनी वॉर्ड अध्यक्षपासून राजकीय जीवनाला सुरुवात केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page