साऊथ कोरियात २६ सुवर्ण , ८ रौप्य व ४ कांस्य पदकाची कमाई
आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सिद्धकला तायक्वादो अकादमीच्या खेळाडूंची सुमार कामगिरी सुरू असून नुकत्याच पार पडलेल्या साऊथ कोरिया येथे झालेल्या १६ व्या वर्ल्ड तायक्वादो कल्चरल एक्सपो आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेत खेळाडूंनी २६ सुवर्ण , ८ रौप्य आणि ४ कांस्य पदकाची कमाई केली आहे.
साऊथ कोरिया येथील तायक्वादो वॉन, जेलबोक – दो , मुज्जू या शहरात ही स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जवळ जवळ विविध देशातील २२००-२५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुंबईतील सिद्धकला तायक्वादो अकादमीतील खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पुमसे आणि क्यूरोगी या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी बजावत भारताचे नाव उंच केले. पुमसे प्रकारात तनिष्का वेल्हाळ , आरव चव्हाण , आर्या चव्हाण , अवनी चव्हाण , शिवांश जोशी, इब्राहीम काझी , चंदन परिडा, यश दळवी यांनी सुवर्ण पदकावर मोहर उमटवली तर निलोद्य राज , दियान मेहता , समायरा जोशी , निमांश चांडोक , समर्थ चंडोक, ईसा काझी , फ्रँक कणाडीया यांनी रौप्य आणि व्योम बन्सल , पूर्वेस म्हात्रे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. खेळाडूंनी प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधित्व केले.
मुंबई (शांताराम गुडेकर )