दापोलीत जनावरांचा गोठा कोसळला, एका गाय दगावली, ५ जनावरे जखमी…

Spread the love

दापोली : दापोलीत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने आज पहाटे  तालुक्यातील वानोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला. या गोठ्यात एकूण सहा जनावरे होती. त्या पैकी एक गाय दगावल्याची घटना घडली आहे. तर पाच जनावरे ही जखमी झाली आहेत.
    

या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील सुरज चव्हाण यांनी तातडीने जेसीबी आणि त्यांचे मजूर आणि गावकऱ्यांच्या मदतीने अन्य जनावरांना वाचविले. या बाबतची माहिती तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. त्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली . या घटनेत चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जनावरांची वैरण पावसात भिजली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page