
रत्नागिरी : राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिची भारतीय संघात निवड झाली आहे.राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिची भारतीय संघात निवड झाली आहे.आसाम येथे होणाऱ्या चाैथ्या आशियाई महिला-पुरूष, चॅम्पियनशीप स्पर्धेत अपेक्षा सहभागी होणार आहे. आशियाई खंडातील १४ देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
सोमवार दि. २० मार्च ते गुरूवार दि. २३ मार्च अखेर चाैथी आशियाई स्पर्धा आसाम येथे होत आहे. भारतीय संघातून खेळण्याची संधी अपेक्षाला प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय खेळाडू एेश्वर्या सावंत पाठोपाठ अपेक्षा सुतार हिनेही खो-खो खेळातील चमकदार कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अपेक्षा पाचवीत असल्यापासून खो-खाे खेळत आहे. रा.भा.शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून तिला विनोद मयेकर, पंकज चवंडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. अपेक्षा वाणिज्य शाखेची पदवीधर झाली असून उत्कृष्ट खेळामुळे ती विविध गटातून जिल्हा, विभागिय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. गतवर्षी नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत अपेक्षा सहभागी झाली होती, तेथेही तिने सुवर्णपदक मिळविले होते