संगमेश्वर- विश्व हिंदू परिषद आणि गोळवलकर गुरुजी स्मृती ग्राम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार वर्गातील मुलींसाठी कन्यापूजन आणि भोंडला कार्यक्रम माभळे येथे अनिल भिडे यांच्या घरी संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
यावेळी डॉ जयश्री जोग , प्रकल्प व्यवस्थापक वनिता देशपांडे,डॉ हर्षदा डिंगणकर, अनुश्री जाधव, दिपाली भानुशाली, मानसी भिडे,अपर्णा भिडे, संध्या पेंणकर, रजनी भागवत, आशा घडशी,गीता मुळ्ये आदी उपस्थित होते.
या निमित्ताने नवरात्र देवीच्या पूजनाबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचेही पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 वी जन्मशताब्दी वर्षे असून त्यानिमित्ताने त्यांच्या बद्दल माहिती मुलांना देण्यात आली .
माभळे घडशीवाडी, काष्ट्ये वाडी आणि भिडेवाडी या ठिकाणी संस्कार वर्ग चालविले जातात . या वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले