कल्याण स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेल दरम्यान रस्ता रुंदीकरणात व्यापा:यांची दुकाने बाधित झाली. त्या दुकानदारांना बेकायदा बांधकामास अधिन राहून तीन पट जास्तीचा मालमत्ता कर वसूलीच्या नोटिसा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या आहेत. या नोटिसांना व्यापारी वर्गान विरोध केला आहे. आमची दुकाने बेकायदा कशी असा सवाल उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या वतीने तत्कालीन आयुक्त ई. रविंद्रन यांनी २०१५ साली शहरातील २३ रस्ते रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यापैकी छत्रपती शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेल दरम्यान रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यावेळी व्यापारी वर्गाकडून रुंदीकरणास विरोध केला गेला. मात्र आयुक्तांनी रुंदीकरणासाठी सहकार्य करा असे आवाहन केल्यावर व्यापा:यांचा रुंदीकरणासाठी विरोध कमी झाला. रस्त्याचे रुंदीकरण झाले. रस्ते रुंदीकरणात ज्या व्यापा:यांची दुकाने तोडली गेली. त्या तोडलेल्या जागेच्या बदल्यात त्यांनी वरच्या दिशेने दुकाने वाढवून घ्यावीत असे स्पष्ट करण्यात आले होते. दुकानदारांनी दुकाने वाढविली.