कांद्याला ३ रुपये किलो भाव मिळाला म्हणून संतप्त शेतकऱ्याने ३०० क्विंटल कांद्यावर फिरवला जेसीबी

Spread the love

छ.संभाजीनगर– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर शिवारातल्या किशोर वेताळ या शेतकऱ्याने ३०० क्विंटल कांद्यावर जेसीबी फिरवला आहे. बाजारात आपल्या कांद्याला केवळ ३ रुपये किलो भाव मिळत असल्याने या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊले उचलले आहे.त्यांनी सव्वा लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतात ची लागवड केली होती मधल्या काळात त्यांना गारपीटीचाही फटका बसला होता, यातून कसं बसं सावरत त्यांनी कांदा पिकाचं उत्पादन घेतलं.पण पिक आल्यावर २०हजार रुपये मजुरीवर खर्चून त्यांनी कांदा काढला.

मात्र,बाजारात भाव मातीमोल मिळाल्याने किशोर वेताळ यांनी हताश होऊन ३०० क्किटल कांद्यावर जेसीबी फिरवला आहे. सध्या वातावरणात होणार सततचा बदल, अवकाळी पावसाने उडणारी शेतकऱ्यांची त्रेधाटीरपीट,यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page