
मंडणगड :- तालुक्यातील वेळास येथील एसटी बस स्टँडवर मुक्कामी असलेल्या बसमधील डिझेल अज्ञाताने चोरून नेले . या प्रकरणी बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल चोरीची ही घटना १५ मार्च रोजी रात्री ११ ते १६ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता या कालावधीत घडली आहे . या बाबत एसटी बस चालक आत्माराम जानाजी गायकवाड ( ३५ , मूळ रा . कासरवाडी पुणे ) यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यानूसार , आत्माराम गायकवाड हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस ( एमएच – १४ – बीटी -१०९७ ) घऊन पिंपरी चिंचवड येथून वेळास येथे गेले होते . ही एसटी बस वेसाळ एसटी बस स्टँडवर मुक्कामी असताना अज्ञाताने तिच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरून नेले . या प्रकरणी अधिक तपास बाणकोट पोलिस करत आहेत .