
रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून अनोळखी इसमाने दागिन्यांची चोरी केली असल्याची घटना चिपळूण चिंचनाका ते एस. टी. स्टँडकडे जाणाऱ्या रोड या दरम्यान घडली. दि. १२ जुलै रोजी साडेबारा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

हकीकत अशी की यातील फिर्यादी चिपळूण बाजारपेठेतून घरी परत जात असताना चिंचनाका ते एस.टी. स्टॅन्डकडे जाणारे रोडवर रस्त्यावर एका अनोळखी इसमाने त्यांना थांबवुन पोलीस असल्याचे सांगुन त्यांचेकडील सोन्याचे दागिने व खिश्यातील साहित्य त्यांच्या रुमालाची गाठ मारुन त्यात ठेवून सदर माल फिर्यादीचे पिशवीत ठेवून हातचलाखीने व फसवणुक करुन फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरून घेवून गेला. माल- रुपये एकूण १,१२,०००/- त्यामध्ये
१). ८८,०००/- रु. किंमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची जीलेबी डिझाईन असलेली चैन जुनी वापरती किंमत सुमारे
२). २४,०००/-रु. किंमतीची ६ ग्रम वजनाची सोन्याची अंगठी जुनी वापरती असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सदर गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर १८७/२०२३ मध्ये भा. द. वि. का. कलम १७०, ४१९ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.