चिपळूण : चिपळूणतालुक्यातील निवळीचे गावचे सुपुत्र व ज्येष्ठ अभिनेते संजय खापरे यांच्याशी संवाद साधण्या साठी चिपळूणवासीयांना संधी प्राप्त झाली आहे.रविवार दिनांक ९ रोजी भावार्थ च्या वतीने नाट्य कट्टा या संमत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध अभिनेते संजय कापरे यांच्याशी गप्पा मारण्यात येणार आहेत.
शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात हा रविवारी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम रंग आहे. टी डब्ल्यूजे, डब्ल्यूजे द सोशल रिफॉर्मर्सच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संजय खापरे यांनी आजवर दे धक्का, काकस्पर्श, राडा लय भारी, दगडी चाळ, गाढवाचं लग्न व काही व्यावसायिक नाटक यामधून भूमिका साकारल्या आहेत. ‘गलतीसे मिस्टेक’ या नाटकासह त्यांनी मराठी रंगभूमी गाजवले आहे. सध्या ‘डोन्ट वरी हो जाएगा’ हे त्याचे नाटक मराठी रंगभूमीवर सुरू आहे. त्याचार प्रयोगही चिपळूण मध्ये १५ एप्रिल रोजी होणार आहे. अभिनेते संजय खापरे यांच्याशी गप्पा मारण्यासाठी चिपळूणवासीयानी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भावार्थच्या वतीने करण्यात आले आहे.