धक्कादायक! पिस्तुलीने गोळ्या झाडून धुळ्यातील एका इसमाची निर्घुण हत्या

Spread the love

धुळे :- धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एका इसमाची पिस्तूलने गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या मिलिंद सोसायटी येथे राहणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष यशवंत बागुल हे त्यांच्या शेतीच्या कामासाठी धुळे तालुक्यातील उभंड येथे गेले होते. शेतातील डाळिंबाच्या झाडांना बांबू लावण्यासाठी आणि मजूर शोधण्यासाठी त्याच्या मामाचा मुलगा व यशवंत बागुल हे शेजारी असलेल्या पिंपरखेड या गावी जाऊन परत येत असताना दोन अज्ञात इसमानी त्यांना उभंड – पिंपरखेडे रस्त्यावरील बारी घाटात थांबवून त्याच्याशी चर्चा करीत असताना त्यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडत तर दुसऱ्या इसमाने चाकूने छातीवर व गळ्यावर वार करत यशवंत बागुल याची निर्घृण हत्त्या केली आहे. यासंदर्भात यशवंत बागुल यांची पत्नी यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात्तांविरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.

घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला यशवंत बागूल याचा मृतदेह तसेच जवळच पिस्तूलचे मॅगझिन, गोळीचा भाग मिळून आला. घटनास्थळाचा पंचनामा व नमुने घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. नेमके हत्ये मागचे कारण कळू शकलेले नाही. यशवंत बागूल हा त्याच्या मामाच्या मुलासोबत उभंड- पिंपरखेड रस्त्याने जात असतांना अचानक यशवंत बागूल याच्यावर मारेकऱ्यांनी हल्ला केला त्यात यशवंत बागुल ह्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना होऊन सदर घटना स्थळाची ची पाहणी करून यशवंत बागुल यांचा मृत्युंजय ताब्यात घेऊन धुळे जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम साठी आणण्यात आला आहे. यशवंत बागुल यांची हत्या का करण्यात आली आणि या हत्यामागे कोण आहे त्याचा तपास पोलीस करीत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page